आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Property And Auto Showcase Useful For City Development

"प्रॉपर्टी अॅण्ड ऑटो शोकेस' शहर विकासासाठी उपयुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दैनिक दिव्य मराठी, तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटेरिअर डिझायनरच्या (आयआयआयडी) संयुक्त विद्यमाने इंटेरियर डिझायनर असोसिएशनच्या (आयडीए) सहयोगाने आयोजित "प्रॉपर्टी अॅण्ड ऑटो शोकेस - २०१६' च्या लोगोचे अनावरण आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते बुधवारी झाले. या प्रदर्शनामुळे शहर विकासाला चालना मिळेल, असे आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.
दैनिक दिव्य मराठी आयआयआयडीच्या संयुक्त विद्यमाने २६, २७ २८ फेब्रुवारीला सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर "प्रॉपर्टी अॅण्ड ऑटो शोकेस - २०१६'चे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून त्याच्या लाेगोचे आमदार जगताप यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी आयआयआयडीचे अध्यक्ष अमोल खोले, आयडीएचे अध्यक्ष अरुण गावडे, अवतारसिंग हिरा, विशाल मुसळे, सूरज नन्नवरे, आशिष गुरुनानी, सचिन हिवाळे, सागर भंडारी, सचिन झुंजूर, राकेश गांधी, ब्यूरो चिफ मिलिंद बेंडाळे, जाहिरात व्यवस्थापक नीलेश सोनवणे, वितरण उपव्यवस्थापक प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, दिव्य मराठीने शहर विकासासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली. शहर विकासाला चालना मिळेल, यासाठी हे वर्तमानपत्र वेगवेगळे उपक्रम राबवते. प्रॉपर्टी अॅण्ड ऑटो शोकेस - २०१६ प्रदर्शनात नगरसह विविध शहरांतील बांधकाम वाहन व्यावसायिक सहभागी होणार आहेत. या उपक्रमामुळे नगरच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल, असे जगताप यांनी सांगितले.

"दिव्य मराठी' क्रेडाईतर्फे मागील वर्षी प्रॉपर्टी अॅण्ड ऑटो शोकेसचे आयोजन करण्यात आले. बांधकाम वाहन व्यावसायिकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. यंदा दिव्य मराठी आयआयआयडीच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात नगर, पुणे, नाशिकसह विविध शहरांतील बांधकाम वाहन क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत. गृह वाहन खरेदीबाबत प्रदर्शनातून माहिती मिळेल. फर्निचर, इंटेरिअर डिझायनिंग, गृह वाहनकर्जाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध बँका फायनान्स कंपन्यांचे स्टॉल प्रदर्शनात असतील. सोबतच खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही असतील. नगरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन "दिव्य मराठी'च्या वतीने करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंग अधिक माहितीसाठी अविनाश ९८२३२९७५२९, दयानंद ८४०८८२३८०५ अभिषेक ८३९०९००७०७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

व्यावसायिकांनी सहभागी व्हावे
^नगरसह इतर शहरांतील बांधकाम वाहन क्षेत्रातील व्यावसायिकांनी या प्रदर्शनात सहभागी व्हावे. घर वाहन हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एकाच छताखाली गृह वाहन खरेदीचे अनेक पर्याय प्रदर्शनामुळे उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळेल.'' अरुण गावडे, अध्यक्ष,आयडीए.

एकाच छताखाली सर्व काही मिळेल
^प्रॉपर्टी अॅण्ड ऑटो शोकेसचे हे दुसरे वर्ष. या प्रदर्शनात घर वाहन खरेदीबाबत सर्व काही एकाच छताखाली उपलब्ध होईल. या प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळेल, अशी खात्री आहे. नगरकरांना प्रदर्शनाचा नक्कीच लाभ होणार आहे. नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.'' अमोल खोले, अध्यक्ष,आयआयआयडी.