आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Property Seizure Occurred On The Borrowers Credit Society 70

संपदा पतसंस्थेच्या 70 कर्जदारांवर आली जप्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-संपदा पतसंस्थेच्या 786 कर्जदारांवर सहकार कायदा कलम 101 नुसार जप्तीची कारवाई सुरू आहे. त्यातील 70 कर्जदारांवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून लिलाव मालमत्तेची किंमत ठरवण्याचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दिली आहे.
बहुचर्चित संपदा पतसंस्थेत ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना गेल्या तीन वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. संस्थेने 786 कर्जदारांना 21 कोटी 35 लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. या सर्वच कर्जदारांवर 101ची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तत्कालीन संचालकांच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कलम 88 च्या कार्यवाहिला खंडपीठाने स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे हौसारे म्हणाले. सोनेतारण कर्जाबाबतही जबाबदारी निश्चित करून वसुली करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ठेवीदारांची शनिवारी (25 जानेवारी) सकाळी 11 वाजता रंगारगल्लीतील डॉ. महाले मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.