आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकानांसाठी रस्ते वर्ग करण्याबाबत सर्व नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट करावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवरील दारू दुकाने बंद करण्याबाबत आदेश दिले. तथापि, न्यायालयाच्या निर्णयातून पळवाट काढण्यासाठी राज्य महामार्ग महापालिकेकडे वर्ग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मूठभर दारू दुकानदारांसाठी हे उद्योग कोण करत आहे, हे जनतेसमोर आले पाहिजे. सर्व पक्ष आणि नगरसेवकांनी आपली भूमिका समाजासमोर मांडली पाहिजे, म्हणजे दारूवाल्यांचे वकील कोण आहेत हे जनतेला समजेल, अशी मागणी अहमदनगर दारूबंदी आंदोलनाने केली.
 
नगरसेविका कलावती शेळके आणि सुनीता भिंगारदिवे यांनी याबाबत जाहीर विरोधी भूमिका घेतल्याबद्दल अहमदनगर जिल्हा दारूबंदी आंदोलनाने त्यांचे अभिनंदन केले. इतर सर्व नगरसेविकांनी अशी स्पष्ट भूमिका घ्यावी आणि तरुण पिढीला व्यसनी होण्यापासून वाचवावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी गुरुवारी पत्रकाद्वारे केले.
 
मुळात महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असताना शहरातील निवडक दारूवाल्यांच्या हितासाठी हा पांढरा हत्ती पोसण्याची गरज आहे का? शहरातील रस्त्याच्या डागडुजीची रक्कम मनपा दारूवाल्याकडून घेणार आहे का? लोकांनी तुम्हाला शुद्ध पाणी देण्यासाठी निवडून दिले आहे, दारू देण्यासाठी नाही याचे या दारूवाल्यांची वकिली करणाऱ्यांनी भान ठेवावे, असे ते म्हणाले.
 
दारुमुळे महिलांवर अत्याचार होत असताना एक महिला महापौर असताना जर पुन्हा दारू दुकाने उघडण्याचा निर्णय होत असेल, तर ते अधिक क्लेशदायक आहे. महापौरांनी याबाबत ठाम भूमिका घेऊन महिलांचा दुवा घ्यावा. महिला संघटना विविध संघटनांनी या विषयावर महापालिकेला जाब विचारावा. सर्व जागरूक नागरिकांनी आपल्या भागातील नगरसेवकांना भेटून महापालिकेने असा निर्णय केल्यास विरोध करावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी या पत्रकात केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...