आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनी बदलली तरी पीएफ खाते राहणार कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बहुचर्चित युनिव्हर्सल अकाउंट नंबरची संकल्पना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने प्रत्यक्षात उतरवली असून त्यासंबंधी विशेष निर्देश जारी केले आहेत. या प्रणालीमुळे कंपनी बदलली, तरी कर्मचा-यांचा पीएफ अकाउंट नंबर कायम राहणार आहे, असे प्रतिपादन भविष्य निधी संघटनचे क्षेत्रिय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले.

एमसीसीआयए, आमी या उद्योजक संघटना व भविष्य निर्वाह निधी संघटनच्या संयुक्त विद्यमाने एमआयडीसीतील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
सहायक आयुक्त हेमंत राऊत, येथील पीएफ कार्यालयातील निरीक्षक नंदकुमार बकरे, डी. डी. लाढाणे, तसेच कैलास गुरव, बी. आर. साबळे, सुधाकर काळे, अशोक पानसरे आदी यावेळी उपस्थित होते. तांबे म्हणाले, नव्या प्रणालीमुळे वेळ व पैशांची बचत होईल. एकापेक्षा अधिकच्या खात्यांचे एकत्रिकरण करणे सोपे होणार आहे. केवायसी संबंधीची माहिती युनिव्हर्सल अकाउंटला जोडली जाऊन पीएफच्या फायद्यासाठी नियोक्यांवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. या प्रणालीसाठी उद्योजकांकडून करावयाच्या कार्यवाहीची माहिती तांबे यांनी दिली. कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबरसंबंधी माहिती देण्याची, तसेच कर्मचा-यांकडून केवायसीसंबंधी दस्तावेज घेऊन ते पीएफच्या डाटा सेंटरवर अपलोड करण्याची जबाबदारी कंपन्यांवर आहे, असे तांबे म्हणाले.