आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Province Officer Office,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रांताधिकारी कार्यालयात मनसेचे धरणे आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- सेतू केंद्र, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालयात सर्वत्र दलालांचा विळखा असून विद्यार्थ्यांच्या विविध दाखल्यांसाठीसुद्धा पैसे द्यावे लागतात. तहसील कार्यालयात नायब तहसीलदारच सर्व कार्यालय चालवतात. भ्रष्ट अधिका-यांना पाठीशी घालणारे प्रांताधिकारीसुद्धा भ्रष्ट आहेत. हे गैरप्रकार त्वरित न थांबल्यास दलालांना तहसील व प्रांत कार्यालयात आणून झोडून काढत मनसे स्टाईलने आंदोलन करू, असा इशारा देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिका-यांच्या दालनात शुक्रवारी सुमारे तासभर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलनाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष केकाण, तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे आदींनी केले. मनसेने एक तास घोषणाबाजी केली. नंतर प्रांताधिकारी ज्योती कावरे यांच्याशी चर्चा केली.
देविदास खेडकर म्हणाले, सर्व विभागांत दलालाशिवाय पान हलत नाही. दुसरे नायब तहसीलदार ख-या अर्थाने महसूलचे काम करतात. दलाल प्रांताधिकारी कार्यालयातही बसतात. नायब तहसीलदार जगदीश गाडे यांची मनमानी सुरू आहे. दाखल्याची कामे त्वरित करावीत. तहसील व प्रांताधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या वतीने मदत केंद्राचे स्टॉल सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. राहुल मासाळकर, किरण पालवे, प्रशांत गायकवाड, बाबासाहेब कंठाळी यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.
दाखल्यांसाठी कर्मचारी नेमू
दाखल्यांसाठी आवक-जावक नोंदवही, नॉनक्रिमिलियर, जातीचे दाखले व अन्य दाखल्यांसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करू. गैरकारभाराबाबत चौकशी करून अहवाल तयार केला जाईल.’’ ज्योती कावरे, प्रांताधिकारी.