आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय लोकअदालतीत तडजोडीने मिटली २७५ प्रकरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हाविधी सेवा प्राधिकरण शहर वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत २७५ प्रकरणे निकाली निघत ६३ लाख ४७ हजार रुपयांची वसुली झाली.

जिल्हा न्यायालयात या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोकन्यायालयात एकदा दावा मिटल्यानंतर पक्षकारांना कुठेही अपील करता येत नाही. कारण दोन्ही पक्षकारांच्या समझोत्याने दावे मिटवण्यात येतात. त्यामुळे वेळ पैशांची बचत होते, असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश वनिय जोशी यांनी या वेळी केले.

जिल्हा सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष वनिय जोशी यांच्या हस्ते रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन लोकअदालतीचे उद््घाटन झाले. या वेळी जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा, सचिव एम. एच. शेख, सरकारी वकील सतीश पाटील, श्रीपाद देशपांडे, वकील संघाचे अध्यक्ष मुकुंद पाटील, उपाध्यक्ष मंगेश सोले, अॅड. शिवाजी कराळे, सुधीर बाफना, आदी उपस्थित होते.

शहरातील १४६७ तालुक्यांतील मिळून एकूण २२६८ प्रकरणे सुनावणीसाठी होती. यामध्ये दाखलपूर्व हजार खटले समाविष्ट होते. विविध मोबाइल कंपन्यांची खटलापूर्व प्रलंबित प्रकरणे, मोटार वाहन अपघात, वीज वितरण कंपनी, अपिलातील दिवाणी फौजदारी, वैवाहिक वाद, दिवाणी दावे, धनादेश वटणे, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, धर्मादाय आयुक्त, ग्राहक तक्रार निवारण मंच या प्राधिकरणातील प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी मांडण्यात आली होती. त्यापैकी बहुतांश प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ही प्रकरणे निकाली निघाली.

आठ पॅनलची नियुक्ती
लोकअदालतीत९१७ प्रलंबित प्रकरणे मांडण्यात आली. त्यापैकी २३७ प्रकरणांत तडजोड होऊन ६२ लाख ३७ हजार रुपयांची वसुली झाली. ८०० खटलापूर्व प्रकरणे मांडण्यात आली. त्यापैकी ३८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन लाख १० हजार रुपयांची वसुली झाली. मुख्यालयात आयोजित केलेल्या लोकअदालतीकरिता एकूण पॅनल नेमण्यात आले होते.

फोटो - विधी सेवा प्राधिकरण वकील संघाच्या वतीने आयोजित लोकअदालतीच्या उद्घाटनाला उपस्थित न्यायाधीश वकील. छाया: लहू दळवी