आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन लाखांवर लाभार्थींना तूरडाळ, १२० रुपयांप्रमाणे जिल्ह्यासाठी ३४० टन डाळ मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तूरडाळीचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी बीपीएल एपीएलधारक रेशनकार्डवर तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील लाख ५० हजार बीपीएल ९३ हजार एपीएल रेशनकार्डधारकांना १२० रुपयांत किलो तूरडाळ मिळेल. पहिल्या टप्प्यात ऑगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यांत तूरडाळ दिली जाणार आहे. शनिवारपासून (६ ऑगस्ट) सर्व तालुक्यांना तूरडाळीचे वितरण होणार आहे. येत्या मंगळवारपासून (९ ऑगस्ट) ग्राहकांना तूरडाळ दिली जाणार आहे.
नगरसह विदर्भ, खानदेश मराठवाड्यात तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या भागात कमी अवेळी झालेल्या पावसामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बाजारात गेल्या दोन वर्षांपासून तुरीचा तुटवडा निर्माण झाला. उत्पादन घटल्याने आवक मंदावली असतानाच बाजारात मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्याने तूरडाळीचे भाव गगनाला भिडले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात किरकोळ बाजारात तूरडाळीचे भाव १८० ते २०० रुपये होते.
भाव कडाडल्याने राज्य सरकारने मागील वर्षी १४ ऑक्टोबरला तूरडाळीचे भाव नियंत्रित करण्यासाठी साठ्यावर मर्यादा घातली होती. त्यानंतर भाव काही प्रमाणात नियंत्रणात आले. काही दिवसांनंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शंभर रुपये िकलो दराने तूरडाळ देण्याचे जाहीर केले होते. तथापि, भाजपची शंभर रुपये किलोची तूरडाळ अनेक महिन्यांनंतरही ग्राहकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यानंतर आता राज्य सरकारने रेशनकार्डवर तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सात जिल्ह्यांत हा प्रयोग राबवल्यानंतर आता नगर जिल्ह्यात अंत्योदय दारिद्र्यरेषेखालील रेशनकार्डधारकांना १२० रुपये किलो दराने तूरडाळ देण्यात येण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लाख ४० हजार लाभार्थींना स्वस्त धान्य दुकानातून ही डाळ मिळेल.

नगर जिल्ह्याला ३५० टन तूरडाळ मिळणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील तालुका पुरवठा अधिकारी कार्यालयाला या डाळीचे थेट वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने कुठल्या तालुक्याला किती तूरडाळ लागते, याच्या याद्या तयार केल्या असून, त्या याद्या पुरवठा करणाऱ्या संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. प्रथम ही तूरडाळ तालुक्याच्या गोदामात येणार आहे. तेथून स्वस्त धान्य दुकानदार ही डाळ घेऊन त्याची लाभार्थ्यांना १२० रुपयांप्रमाणे विक्री करणार आहेत. शनिवार (६ ऑगस्ट) पासून जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील शासकीय गोदामात ही तूर देण्यात येणार आहे. ऑगस्टपासून लाभार्थींना १२० रुपयांत तूरडाळ दिली जाणार आहे.दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात तुरीच्या ३० हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या २५४.२८ टक्के तुरीची पेरणी झाली आहे. चांगल्या पेरणीमुळे यंदा तुरीचे उत्पादनही वाढण्याची शक्यता आहे.

यावर्षी तूरडाळीचा काळाबाजार थांबणार
गेल्या वर्षी तूरडाळीचे भाव कडाडल्यानंतर सरकारने साठ्यांवर निर्बंध आणले होते. जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्याच्या अनेक भागात ४०० हून अधिक छापे घातले. मात्र, प्रशासनाला एक किलोदेखील तूरडाळ मर्यादित साठ्यापेक्षा जास्त आढळून आली नाही. आता लाभार्थींना रेशनकार्डवरच तूरडाळ देण्यात येणार असल्याने काळाबाजार काही प्रमाणात थांबणार आहे.

आजपासून डाळीचे सर्व तालुक्यांत वितरण
^अंत्योदय दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड धारकांना १२० रुपये किलो दराने ऑगस्ट, सप्टेंबर ऑक्टोबर असे तीन महिने स्वस्त धान्य दुकानामधून तूरडाळ दिली जाणार आहे. प्रत्येक रेशनकार्डधारकाला महिन्याला किलो डाळ १२० रुपये किलो दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. शनिवार (६ ऑगस्ट) पासून या डाळीचे सर्व तालुक्यांना वितरण होणार असून, ऑगस्टपासून ग्राहकांना वितरण सुरू केले जाणार आहे.'' राहुलजाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...