आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Bangaluru Pune 1610 Km Cut Within 21.30 Hours

पुणे-बंगळुरू-पुणे १६१० किलोमीटर अवघ्या २१.३० तासांत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अमेरिकास्थित आयर्न बट्ट संस्थेचं 'वर्ल्ड टफेस्ट रायडर सॅडलसोर'चं बिरुद मिळवणं हे जगातील प्रत्येक बायकरचं स्वप्न असतं. मूळचे नगर जिल्ह्यातील मिरजगावचे सध्या पुण्यात लॉजिस्टिक कंपनीचे संचालक असलेल्या संतोष होनकर्पे यांनी नुकताच हा बहुमान मिळवला.

अमेरिकेतील ही संस्था काही चॅलेंजेस तुमच्यापुढे ठेवते. हे चॅलेंज स्वीकारून तुम्ही ते पूर्ण केलं, की संस्था तुम्हाला सन्माननिय सभासदत्व बहाल करते. मोटारसायकलीवरून २४ तासांत पुणे-बंगळुरू-पुणे हे १६१० किलोमीटर प्रवास करण्याचं चॅलेंज या संस्थेनं संतोष यांना दिलं होतं. त्यांनी नुकतंच ते यशस्वीपणे पूर्ण केलं. विशेष म्हणजे त्यांनी हे अंतर २४ ऐवजी केवळ २१.३० तासांतच पार केलं!

या साहसाविषयी सांगताना संतोष म्हणाले, मागच्या वर्षी केलेली लेह, लडाखची मोटारसायकल सफर खूपच रोमांचकारी ठरली. स्नेही विजय केळकर यांच्याकडून सॅडलसोरविषयी समजलं. रायडर शलाका देवजित यांच्याकडून त्याबाबत मी माहिती घेतली. सॅडलसोर करायचं ठरवल्यावर लगेचच तयारी सुरू केली. प्रथम माझी "केटीएम-३९० ड्यूक' मोटारसायकल व्यवस्थित सर्व्हिसिंग करून घेतली. जुने झालेले टायर बदलले. खात्री करून घेण्यासाठी पुणे-कोल्हापूर-पुणे हा प्रवास फक्त साडेपाच तासांत पूर्ण केला. या रेकी राइडमुळे माझा आत्मविश्वास वाढला. प्रारंभी आधी तिघे जण असणार होतो, पण शेवटी मला एकट्यालाच हे आव्हान स्वीकारावं लागलं. पुण्यातून निघताना समजलं बंगळुरूकडे पाऊस सुरू आहे. त्यामुळे राइड पुढे ढकलावी, असा सल्ला बहुतेकांनी दिला, पण नेटवरून संपूर्ण रूटचा अंदाज घेऊन निघायचं ठरवलं.

गाडीला व्हेईकल ट्रॅकिंग डिव्हाइस बसवले होते. त्यामुळे माझं लोकेशन, स्पीड या गोष्टी मित्रमंडळी नेटवरून अॉनलाइन पहात होते. पत्नी तृप्ती मुली सई, माहीचा निरोप घेऊन रात्री ११ वाजता प्रस्थान केलं. गाडीचा वेग १३० ते १४० च्या आसपास होता. इंधनाची टाकी छोटी असल्यानं प्रत्येक २०० किलोमीटरनंतर पेट्रोलसाठी थांबावं लागत होतं. हुबळीच्या पुढचा रस्ता एकेरी असल्यानं धोकादायक होता. समोरच्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे त्रास होऊ लागला. बंगळुरूला पोहोचताच यू-टर्न घेऊन पुन्हा पुण्याकडे निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२७ ला पुण्यात पोहोचलो. बरोबर २१ तास ३० मिनिटांत १६१० किलोमीटरचं अंतर मी पूर्ण केलं, असं संतोष यांनी अभिमानानं सांगितलं.

पुढे वाचा, बाबा सुखरूप आले...