आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Blast Issue Crimenal Banty Jahagirdar Oppose March At Shrirampur

बॉम्बस्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारविरोधात श्रीरामपुरात निषेध मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना मदत केल्याप्रकरणी बंटी जहागीरदार याला दहशतवादविरोधी पथकाने अटक केल्यानंतर या आरोपींचा व बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी निषेध मोर्चा काढला.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, शिवसेनेचे राजेंद्र देवकर, शत्रुघ्न गव्हाणे, सदाशिव पटारे, विश्व हिंदू परिषदेचे विजय जयस्वाल, मनसेचे बाबा शिंदे, तिलक डुंगरवाल, बजरंग दलाचे कुणाल करंडे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. रेल्वेस्टेशनजवळील हनुमान मंदिरापासून मोर्चास प्रारंभ झाला. मेनरोडमार्गे अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा गेला.