आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune University Masking Sticker Found At Ahmednagar

पुणे विद्यापीठाचे ‘मास्किंग स्टिकर’ रस्त्यावर बेवारस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटवले जाणारे पुणे विद्यापीठाचे ‘मास्किंग स्टिकर’ गुरुवारी सायंकाळी रस्त्यावर बेवारस आढळले. छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष केदार भोपे यांना हे स्टिकर्स सापडले. यामागे काहीतरी गैरप्रकार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
परीक्षा पद्धतीमध्ये केलेल्या बदलांचा एक भाग म्हणून उत्तरपत्रिकांवर ‘मास्किंग स्टिकर’ चिकटवले जातात. नुकत्याच काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. परीक्षेनंतर उर्वरित स्टिकर विद्यापीठात जमा करणे अपेक्षित असते. परंतु गुरुवारी काही स्टिकर्स न्यू आर्टस्समोरील रस्त्यावर पडल्याचे भोपे यांना आढळले. काही शाळकरी मुलांनीही स्टिकर्स नेले.