आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune University Very Soon Graduate Degree Result Declare

पुणे विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पुणे विद्यापीठाच्या पदवीची परीक्षांची निकालप्रक्रिया रखडली आहे. परंतु त्यामुळे पदव्युत्तर प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पदवीचे लांबलेले निकाल लवकरच लागतील, असे विद्यापीठाच्या नगर उपकेंद्राचे संचालक प्रा. एस. एस. रिंढे यांनी सांगितले.

प्राध्यापकांच्या संपामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा लांबली होती. त्यामुळे कला व शास्त्र शाखेचे निकाल उशिरा जाहीर झाले. वाणिज्य द्वितीय व तृतीय शाखेचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. निकाल हातात पडला नसल्यामुळे पुढील वर्षात प्रवेश घेण्यासाठी अडचणी येत आहेत. प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाईल. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून निकालपत्र डाऊनलोड करावी, असे प्रा. रिंढे म्हणाले.