आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjabi Sikh Community,latest News In Divya Marathi

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पंजाबी-शीख समाजाचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गणपती विसर्जनाच्या दिवशी श्रीरामपूर येथे व्यावसायिकाला झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. त्याचा निषेध करत पंजाबी-शीख समाजाने विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणारे निवेदन मंगळवारी प्रशासनाला दिले.

अमरप्रित ऊर्फ हॅपी सेठी (२६, श्रीरामपूर) यांना श्रीरामपूर येथे आठ-दहा गुंडांनी अमानुष मारहाण केली. ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या पुण्यात उपचार सुरू आहेत. त्यांचा डावा डोळा निकामी झाला असून उजव्या डोळ्यालाही गंभीर इजा झाली आहे. सेठी यांच्या फिर्यादीवरून माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लाड, विकी गोरे, संतोष मगर, संतोष वायकर व इतर पाच-सहाजणांविरूद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शीख समाज व्यवसायाच्या निमित्ताने जिल्ह्यात स्थिरावला आहे. या घटनेने समाजात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही आरोपींना अटक झालेली नाही. आरोपींच्या अटकेची मागणी करत शीख समाजाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. मतदानावर बहिष्काराचा इशारा त्यात देण्यात आला आहे. यावेळी सरबजितसिंग सेठी, हरजितसिंग वधवा, राजव चुग, गुरबच्चनसिंग चुग, लकी सेठी, महाराज कंत्रोड, देवेंद्रसिंग वधवा, रतनसिंग सेठी, ग्यानी मसकनजी, जसपालसिंग ठकराल, बंटी गुरुवाडा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.