आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्णवाद महोत्सवाला देशविदेशातील भाविकांची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर- येथील ६2 व्या पूर्णवाद महोत्सव, गुरू-शिष्य मेळावा व दत्तमूर्ती स्थापनोत्सवाचे वेदमूर्तींनी केलेले मंत्रजागर व विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगलमय वातावरणात उद्घाटन झाले. 2९ मे पर्यंत चालणा-या महोत्सवासाठी देशभरासह विदेशातील शिष्य दाखल झाले आहेत.
पूर्णवाद प्रणेते डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी ६2 वर्षांपूर्वी गुरू-शिष्य मेळाव्याच्या माध्यमातून परंपरा सुरू केली होती. त्यांचे चिरंजीव विष्णू महाराज यांनी पूर्णवाद महोत्सवाचे स्वरूप देऊन पूर्णवादाचा विचार संपूर्ण विश्वभरात पोहोचवला. गुरुवारी (22 मे) रात्री पुणे येथील वेदमूर्ती दंडगे गुरुजी व ब्रम्हवृंदांनी केलेला वेदमंत्रांच्या जागराने वातावरण मंगलमय झाले. यावेळी विष्णू महाराज, खासदार चंद्रकांत खैरे, पूर्णवाद महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष गुणेश पारनेरकर, कार्यवाह लक्ष्मीकांत पारनेरकर आदी उपस्थित होते.
कार्याध्यक्ष गुणेश पारनेरकर म्हणाले, पूर्णवाद महोत्सवाच्या माध्यमातून गुरू-शिष्य परंपरेला प्राधान्य देत जात, धर्म, भाषा, प्रांत यापुढे जाऊन एक परिवार आहोत, असे शिक्षण व कार्यक्रम या महोत्सवात दिले जातात व युवकांच्या संस्कृती व शिस्तीचे दर्शनही येथे घडते असे सांगितले.
खासदार चंद्रकांत खैरे यांनी पूर्णवाद तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून पारनेरकर महाराजांनी मानवी जीवनाचे शास्त्र संपूर्ण जगाला सांगितले असून त्यांचे पूर्णवादी विचार माणूस जोडण्याचे काम करील, असा विश्वास व्यक्त केला.
पूर्णवाद महोत्सवात शुक्रवारी सकाळी आळंदी येथील अशोकशास्त्री कुलकर्णी यांचे संस्कृतमधून व्याखयान झाले. सायंकाळी पुणे येथील स्वरस्वतीताई यांचे प्रवचन झाले. रात्री प्रसिद्ध गायिका पद्माताई तळवळकर यांची शास्त्रीय संगीत सभा रंगली. यावेळी संगीता पारनेरकर, शलाका पारनेरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.