आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Quality Of The Education Needed For The Growth Of Education In Pleasant MLA Shivaji Kardile

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आनंददायी शिक्षणाची गरज- आमदार शिवाजी कर्डिले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आनंददायी शिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. नगर तालुक्यातील वारूळवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार कर्डिले म्हणाले, ग्रामीण भागातील पालक मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यास कमी पडतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. यावेळी लोकसहभागातून मुख्याध्यापक चंद्रभान रूपनर व शिक्षक राजेंद्र ठुबे यांनी पोषण आहारासाठी टेबल व शालेय कार्यक्रमांसाठी व्यासपीठ तयार केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. केंद्रस्तरीय वक्तृत्व व हस्ताक्षर स्पर्धेत दोन वर्षे यश मिळवणार्‍या सचिन वारुळे व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा पंचायत समिती सभापती शरद झोडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी एस. एम. ठोकळ यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी केंद्रप्रमुख तुकाराम कातोरे, रा. वि. शिंदे, सविता देशमुख, राजेंद्र भुजबळ यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.