आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट पोलिस: एकाच वेळी ५० हजार 'एसएमएस अलर्ट', फेसबुक संकेतस्थळही तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सोशल नेटवर्कद्वारे स्वत:ला "अपडेट' करत नगरचे पोलिस आता "स्मार्ट' झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व मोबाइलधारकांना चोरांपासून संरक्षण, नैसर्गिक आपत्तीबाबत 'अलर्ट', तसेच अफवांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन करणारी एसएमएस सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे एकाच वेळी ५० हजार, अशा टप्प्यांत अल्पावधीतच जिल्ह्यातील तब्बल ३० लाख मोबाइलधारकांना एसएमएस पाठवता येतील.
जिल्हा पोलिस दलाचे स्वतंत्र संकेतस्थळ "फेसबुक पेज'ही तयार झाले असून लवकरच लोकांच्या सेवेत रूजू होणार आहे. पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख यांनी त्याकरिता पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात सुमारे ३० लाख मोबाइलधारक आहेत. कोठेही अनुचित प्रकार घडला, तर खात्री करता संदेश एकमेकांना "फॉरवर्ड' केले जातात. त्यामुळे अफवा पसरतात. यावर उपाय म्हणून पोलिसच अधिकृत योग्य माहिती एसएमएसने देणार आहेत. नॅशनल इन्फोरमॅटिक सेंटरच्या माध्यमातून "क्विक एसएमएस' पाठवण्याची सुविधा पोलिसांनी विकसित केली आहे. एकाच वेळी ५० हजार मोबाइलधारकांना "क्विक एसएमएस' पाठवता येतील. सध्या पोलिसांकडे २३ लाख मोबाइल क्रमांक उपलब्ध आहेत. दोन दिवसांपासून ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु झाली आहे.
महाराष्ट्र पोलिस दलाच्या संकेतस्थळावर नगरची तुटपुंजी माहिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद इतर काही जिल्ह्यांत पोलिसांची स्वतंत्र संकेतस्थळे फेसबुक पेजेस आहेत. त्याच धर्तीवर आता नगर पोलिसांचे स्वतंत्र संकेतस्थळ तयार झाले आहे. मोबाइल अॅप्सची लोकप्रियता वाढत आहे. "व्हॉट्स अॅप' बहुतांश लोक वापरतात. या अॅप्सद्वारे काही आक्षेपार्ह गोष्टी शेअर होतात. आक्षेपार्ह शेअरिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून करडी नजर ठेवण्यात येणार आहे. व्हॉटस् अॅपवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात एक सक्षम अधिकारी नेमलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व्हॉटस् अॅपवर शंभर जणांचे दोन ग्रूप करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकऱ्यांनी दिले आहेत. पत्रकार शांतता समितीच्या सदस्यांचाही यात सहभाग असेल. याद्वारे व्हॉटस् अॅपवरून पसरणाऱ्या अफवांना आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
संकेतस्थळ फेसबुक पेजच्या माध्यमातून पोलिसांनी शहर जिल्ह्यात केलेल्या कारवाया, तसेच चांगल्या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. नागरिकांकडून या सेवेचे स्वागत होत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, स्वतंत्र ट्विटर, फेसबुक अन् अॅप्स...