आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आबांनी\'च वाढवली दारूविक्रीची वेळ, तत्कालिन मुंबई पोलिस आयुक्तांचाही होता विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मुंबईतील डान्सबारवर बंदी घालणारे तत्कालीन गृहमंत्री आर. अार. पाटील यांच्या आदेशानुसारच नाताळ नववर्षानिमित्त तीन दिवस राज्यभरातील हॉटेल्स्, परमीट

रुम दारूविक्री पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आता ही परंपरा रुढ होण्याचीच चिन्हे अाहेत. पवित्र सणांच्या दिवशी दारूविक्री बंद

ठेवण्याची मागणी मिशन सत्य वचनचे संजीव पाटोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कोणताही धर्म पवित्र सणांच्या दिवशी दारू पिण्याची परवानगी

देत नाही. मात्र, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या परवानगीमुळे ख्रिश्चन धर्माची बदनामी होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून २४, २५ ३१ डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल्स, परमीट रुम दारुची दुकाने सुरू ठेवण्यास सरकारकडून परवानगी देण्यास सुरुवात झाली अाहे.

मुंबईस्थित इंडियन हॉटेल अँड रेस्टाॅरन्टस् असाेसिएशनकडून ही मागणी गृहमंत्र्यांकडे केली जाते. कोणताही विचार करता गृहमंत्रालयाकडून सरसकट राज्यभरासाठी हा

निर्णय लागू केला जातो. २०१२ मध्ये शासनाने परवानगी नाकारल्यानंतर असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका

फेटाळून लावली. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनीही २०१३ मध्ये अशी परवानगी देऊ नये, असा अभिप्राय गृहविभागाला दिला. गुन्हेगारीत झालेली वाढ अशा परवानगीने गुन्हे

घडण्याची शक्यता असल्याची आकडेवारीही अभिप्रायासोबत देण्यात आली. असे असतानाही तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गेल्या वर्षी दारूविक्रीसाठी वेळ

वाढवून देण्याचा आदेश दिला. केवळ मुंबई आसपासची शहरे यासाठी असलेला आदेश राज्यभरात लागू केला जातो.

यातून ख्रिश्चन धर्मियांबाबत गैरसमज पसरत असून यावर्षी, तरी अशी परवानगी देऊ नये, अशी मागणी पाटाळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. पोलिस दलावर

पडणारा बंदोबस्ताचा ताण धार्मिक संघटनांकडून अशा कार्यक्रमांवर घालण्यात येणाऱ्या बंदीतून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडेही पत्रात लक्ष

वेधण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. पाटोळे यांनी यासंदर्भात गृहविभागाचे सचिव, नगरचे जिल्हाधिकारी,इंडियन हॉटेल अँड

रेस्टारंट असोसिएशनला नोटीस दिली आहे.

गैरसमज दूर व्हावेत...
-कोणताहीधर्म दारू किंवा अंमली पदार्थांचे सेवन करण्याची परवानगी देत नाही. नाताळ नववर्षानिमित्त दारूविक्रीची वेळ वाढवल्याने ख्रिश्चन समाजाबाबत गैरसमज

पसरत आहेत. या गैरसमजांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाताळ नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३१ डिसेंबर या दिवशी दारूविक्री बंद

ठेवण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.” संजीवपाटोळे, तक्रारदार.

हिंदू जनजागृती समितीचीही मागणी
-राज्यातीलतीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे सार्वजनिक जागा आदी ठिकाणी नववर्षाचा जल्लोष करण्याच्या नावाखाली गैरप्रकार चालतात. डिजे, फटाके वाजवून ध्नविप्रदूषण केले

जाते. अंगविक्षेप छेडछाडीचेही प्रकार होतात. तसेच मद्यमानामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. हे गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हाधकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी

हिंदू जनजागृती समितीकडून करण्यात आली आहे.