आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेपाच लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात लाख ५४ हजार ९२७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या अाहेत. सर्वाधिक लाख १० हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. हरभऱ्याची ३५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने अनेक भागात गव्हाची पेरणीही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.
सप्टेंबरपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती. ते १७ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली. खरीप हंगामात साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. मात्र, पावसाअभावी खरिपातील बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग ही पिके वाया गेली. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. खरीप हंगामात सर्वात कमी पावसाची नोंद असलेल्या पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदे, नगर, पारनेर, राहुरी, राहाता या तालुक्यांत परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या हंगामासाठी आशादायक चित्र निर्माण झाले.

जिल्ह्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत ३९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी रब्बीचे लाख १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा रब्बीसाठी लाख ८७ हजार ९४० क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले होते. परतीच्या दमदार पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. आतापर्यंत लाख ५४ हजार ९२७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक ज्वारीची लाख १० हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका हजार ५१२, हरभरा ३५ हजार ६७९ करडईची हजार ६६३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पारनेर तालुक्यात ज्वारीची ७७ हजार १८७, श्रीगोंदे ७२ हजार, कर्जत ७३ हजार ३३०, जामखेड ७९ हजार १००, शेवगाव १८ हजार ४०६, पाथर्डी २८ हजार, नेवासे १९ हजार, राहुरी १७ हजार २००, संगमनेर १६ हजार, कोपरगाव हजार ५००, श्रीरामपूर हजार ५३८ राहाता तालुक्यात हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत ज्वारी, गहू, मका अन्य रब्बीतील तृणधान्यांच्या ७७.२१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. हरभरा अन्य कडधान्याच्या ३४.९७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. करडई, तीळ, जवस सूर्यफूल या पिकांच्या ११.४७ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

नेवासे, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, श्रीगोंदे कोपरगाव या तालुक्यांमध्ये उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आतापर्यंत जिल्ह्यात २३ हजार ९५७ हेक्टर क्षेत्रावर उसाची नव्याने लागवड करण्यात आली आहे. नेवासे तालुक्यात सर्वाधिक उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे तेथून पाण्याला वाढती मागणी आहे.

१० हजार हेक्टरवर गहू
ऑक्टोबरअखेरपासून जिल्ह्यात रब्बी हंगामातील गव्हाच्या पेरण्यांना सुरुवात झाली. आतापर्यंत गव्हाची १० हजार ७४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात गव्हाचे एकूण क्षेत्र लाख ३७ हजार १३० हेक्टर आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढू लागल्याने गव्हाच्या पेरण्यांनाही वेग येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...