आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhakrishan Vikhe News In Marathi, State Agriculture Minister, Divya Marathi

नेवाशात कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंच्या सभेत अंडी फेकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रचारसभा सुरू असताना त्यांच्या दिशेने अंडी फेकण्यात आली. हा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास नेवाशात घडला. नेवासे येथील ग्रामपंचायत चौकात काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ विखे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. विखे यांचे भाषण सुरू असताना त्यांच्या दिशेने अंडी फेकण्यात आली.

एक अंडे त्यांच्याजवळ पडले, तर दुसरे लांब पडले. यावेळी जि. प. अध्यक्ष विठ्ठल लंघे उपस्थित होते. या प्रकारामुळे विखेंनी भाषण आटोपते घेतले. नंतर पाचेगाव येथेही सभा होणार होती. तेथे उमेदवार वाकचौरे यांना ग्रामस्थांनी बोलू दिले नाही. ग्रामस्थांनी त्यांना चक्क हाकलून देत सभा उधळून लावली.