आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Radhakrishna Vikhe Patil Demand For State Full time Home Minister

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा : राधाकृष्ण विखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी केली.

शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना गृह खात्यासाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री देणे गरजेचे आहे. देशात दहशतवादी कारवाया वाढत आहेत. पोलिसांकडून अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकांवर कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही. महासंचालक मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त अधिकार असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्या बाबतीत सरकारने निर्णय घेणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. मराठवाड्यातही आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्या रोखण्यासाठी आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरकारने तसे न केल्यास उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असे विखे म्हणाले.

गुजरातला पाणी देण्याबाबत सरकारने तयार केलेला मसुदा संकेतस्थळावर जाहीर करावा. ते हा मसुदा जाहीर करत नसल्यामुळे त्यांच्या हेतूविषयी संशय येऊ लागला आहे, असे विखे यांनी सांगितले.