आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबंदकी मिटवा, मग राज्याची चिंता करा : विखे पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - आधी भाऊबंदकीचा वाद मिटवा, मगच महाराष्ट्राच्या प्रश्नांची चिंता करा. आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आधी ते समजून घ्यावे लागतात, त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दांत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

ठाकरे यांनी श्रीरामपूरच्या दौर्‍यात विखे यांच्यावर टीका केली होती. ‘काँग्रेस पक्षात अडगळीला पडलेल्या विखे पिता-पुत्रांना बाळासाहेबांनीच मंत्रिपद दिले होते,’ अशी आठवणही त्यांनी करून दिली होती. त्याला उत्तर देताना विखे म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला आदर असून त्यांच्या नेतृत्वाखाली मी कामही केले आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या भाऊबंदकीच्या वादात त्यांच्याच कुटुंबात बाळासाहेबांची उपेक्षा होत आहे. याच कारणाने जवळची माणसे पक्ष सोडून निघून चालली. मात्र, नेतृत्वाला जाग यायला तयार नाही. दुष्काळी परिस्थितीत, गारपिटीच्या संकटात शेतकर्‍यांचे दु:ख जाणून घ्यायला उध्दव ठाकरे, सदाशिव लोखंडे गेले नाहीत. आघाडी सरकारने मदतीचा हात पुढे करून आपले दायित्व निभावले’, असे विखे म्हणाले.

आज आमच्यावर टीका करणारे ठाकरे, लोखंडे नगर-मराठवाड्याचा पाणीप्रश्न निर्माण झाला, त्या वेळी कोठे होते? जिल्ह्यात हक्काच्या पाण्यासाठी त्या वेळी संघर्ष सुरू असताना यांना जनतेची आठवण झाली नाही, अशी टीकाही विखे यांनी या वेळी केली.