आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या नादी लागाल तर झोडपून काढू : राधाकृष्ण विखे पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - शिर्डी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी तिकिटासाठी शिवसेना नेतृत्वाला पैसे दिल्याचा आरोप कॉँग्रेसचे नेते व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. तसेच यापुढे आमच्या नादी लागाल, तर तुमच्याच झेंड्यांच्या काठ्या काढून झोडपून काढू, असा इशाराही त्यांनी लोखंडेंना दिला.

काँग्रेस आघाडीचे शिर्डीतील उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ शेतकरी मंगल कार्यालयात व्यापारी, हमाल, मापाडी आणि विविध दलित संघटनांच्या झालेल्या मेळाव्यात विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे होते. विखे म्हणाले, छगन भुजबळ, नारायण राणे, प्रकाश परांजपे यांनी शिवसेना सोडली. त्यांच्यावर शिवसैनिकांनी का हल्ले केले नाहीत? वाकचौरे दलित आणि गरीब आहेत, म्हणून त्यांना त्रास दिला जातो. आम्हीही शिवसेना सोडली. आम्हाला त्रास देण्याची हिंमत झाली नाही. आता मात्र आमच्या नादी लागलात, तर झोडपून काढू, असा इशारा त्यांनी दिला.

बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, त्यांचे वारस म्हणवणारे वडापाव आणि चिकन सूपची चर्चा करत आहेत. त्यांच्या पक्षात तिकिटे विकली जातात. अशा स्थितीत खासदार वाकचौरे यांना मी काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली. त्यांना तिकीट दिले. त्यात वाकचौरे यांची चूक काय? असा सवाल विखे यांनी केला.