आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले...नाही मिळाले एकही पद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्याच्या हातातोंडाशी आलेली दोन पदे बुधवारी मुंबईतील घडामोडीत हिरावली गेली. विजय औटी यांच्या रुपाने विधानसभेचे अध्यक्षपद, तर राधाकृष्ण विखे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची संधी होती. मात्र, विश्वासदर्शक ठरावाच्या घडामोडीत दोन्ही संधी वाया गेल्या. विधानसभा अध्यक्षपदासाठी आमदार विजय औटी यांनी अर्ज भरला होता.
बहुमत सिद्ध करण्याच्या खटाटोपात भाजपशी चर्चा होऊन औटींच्या पदावर शिक्कामोर्तब व्हावे, अशी अनेकांची अपेक्षा होती.. मात्र, फाटाफुटीच्या भीतीने पक्षाने औटींना माघार घेण्यास भाग पाडले. भाजपच्याच हरिभाऊ बागडे यांची या पदावर बिनविरोध निवड झाली. काँग्रेसचे गटनेते विखे यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. शिवसेनेने भाजपला साथ दिली असती, तर हे पद आपसूकच विखे यांच्याकडे आले असते. मात्र, शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला.