आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनातन संस्थेवर तातडीने बंदी घालावी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी सरकारला अजून कोणत्या पुराव्यांची गरज आहे, असा थेट सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी उपस्थित केला. सीबीआयने उच्च न्यायालयात सादर केलेले पुरावे लक्षात घेता सनातन संस्थेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट होण्याची गरज व्यक्त करतानाच संस्थेवर तातडीने बंदी घालण्याच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला.
नगर येथे शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना विखे म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यानंतर सनातनवर सरकारने बंदी घालावी, अशी मागणी आम्ही सातत्याने करत होतो. पण मंत्रीच सबळ पुराव्य‍ाचे कारण देत वेळ मारून नेत होते. राज्यातील गुन्हेेगारी वाढण्यास सरकारचा हलगर्जीपणाच कारणीभूत ठरला असल्याचे नमूद करून दोन्ही हत्यांचा तपास सीबीआयने पुढे नेला. हे राज्याच्या गृह विभागाचे मोठे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. वाढलेली गन्हेेगारी, पोलिसांवरील हल्ले, महिला अत्याचाराच्या घटना पाहिल्या, तर या सरकारची ओळख ‘मेक इन महाराष्ट्र नव्हेे तर, क्राईम इन महाराष्ट्र’ अशीच करावी लागेल, असा टोला विखेंनी लगावला.

पूर्णवेळ गृहमंत्री द्या
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे, हे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असावा, ही आमची मागणी कायम असल्याचे विखे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...