आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Radhakrushna Vikhe Patil Comment On Sai Baba Insult

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यापुढे साईबाबांचा अपमान सहन करणार नाही : विखे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी यापुढे श्रीसाईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे थांबवावे. साईभक्त व शिर्डी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून साईबाबांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी शिर्डी येथे दिला.

शंकराचार्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना शनिवारी कृषिमंत्री विखे यांनीही शंकराचार्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. विखे म्हणाले, राज्यात कुणाच्या चिथावणीवरून साईबाबांची मूर्ती तोडण्याचा प्रकार होत असेल, तर सरकार कायदेशीर कारवाई करेल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आला, तर आपण मुख्यमंत्र्यांशीही बोलू, असे त्यांनी स्पष्ट केले.

शंकराचार्यांविषयी आपल्याला आदर असला, तरी त्यांच्या साईबाबा विषयीच्या वक्तव्याने करोडो साईभक्त व्यथित झाले आहेत. प्रत्येकाचे धर्माविषयी काही मत असेल, तर वैयक्तिक असावे. ते सार्वजनिक करणे उचित नाही. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे, श्रद्धेप्रमाणे आचरण करण्याचा अधिकार आहे. कुणी याबाबत कसे वावगे, काय करावे हे कुणी सांगण्याची गरज नाही, असा टोलाही विखे यांनी लगावला. यावेळी संस्थानचे कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे, उपकार्यकारी अधिकारी कैलास कोते, सतीश गंगवाल, प्रमोद गोंदकर, राजेंद्र गोंदकर, नितीन शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर, विलास कोते आदी यावेळी उपस्थित होते.