आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष यात्रेमुळे सरकारची अब्रू चव्हाट्यावर : राधाकृष्ण विखे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, या मागणीसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे सरकारची अब्रू चव्हाट्यावर आली. सरकार संवाद यात्रा काढून कर्जमाफीच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करत असले, तरी शेतकऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावेच लागेल, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिला. 
 

तूर खरेदीच्या मुद्यावर सरकारचे अपयश सिद्ध झाले आहे. कृषी पणन विभागात नसलेल्या समन्वयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अार्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करा, सरकारने तूर उत्पादकांना जाहीर केलेला भाव आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती मिळालेल्या पैशाची तफावत सरकारने बोनस म्हणून शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. 

तीन टप्प्यांत काढलेल्या संघर्ष यात्रेचा उद्देश हा फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी होता. या प्रश्नाचे आम्हाला राजकीय भांडवल करायचे नाही, हे आम्ही सातत्याने सांगत आहोत. राज्यात हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, तरीही सरकार गंभीर नसेल, तर आम्हालाही संघर्षाची तीव्रता वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असे विखे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...