आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-शिवसेनेतील राजकारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष : विखे-पाटील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील. - Divya Marathi
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील.
अहमदनगर- सरकारमधील दोन प्रमुख पक्षांमध्ये सुरू असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष झाल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे. 
 
दिवाळीसाठी नागरिक मोठ्या शहरांमधुन बाहेरगावी जात असतात त्यामुळे एसटीला मोठी गर्दी असते त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खासगी वाहनचालकांकडून प्रवाशांची मोठी लूट होत असून प्रवाशांना असुरक्षित प्रवास करावा लागत आहे. याबाबत विखे-पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान कामगारांच्या संपामुळे एसटीच्या जिल्हाभरातील 2 हजार 611 फेऱ्या रद्द झाल्या आहेत. दिवसभरात एकही एसटी सुटली नाही. जिल्ह्यातील 3 हजार 344 कामगारांचा संपात सहभाग आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती 
बातम्या आणखी आहेत...