आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहाता तहसीलदारांकडून माहिती देण्यास टाळाटाळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी: राहाता तहसील कार्यालयात माहितीच्या अधिकारात माहिती मिळवण्यासाठी आलेल्या अर्जाला केराची टोपली दाखवली जात असून, याबाबत अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने पुणतांबा येथील माधव ओझा यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
सरकारी कामकाजात पारदर्शकता यावी, म्हणून राज्य व केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना आपल्याला हवी असलेली माहिती मिळावी, यासाठी माहितीचा अधिकार दिला आहे. मात्र, सध्या राहाता तहसीलदारांकडून माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती दिली जात नाही. पुणतांबा येथील नागरिकांनी अवैध गौण खनिज उत्खनन पंचनामे व खासगी दाखल अर्जावर दोन वर्षांत अधिकार्‍यांनी काय आदेश दिले व अशा अर्जावर कार्यवाही पूर्ण होऊन अर्ज निकाली निघण्यापर्यंतचा कालावधी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण आहे. तहसीलच्या या कामकाजामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कामाच्या निषेधार्थ ओझा यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.