आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Deshpande And Anand Bhate's Program In Ahmednagar

राहुल देशपांडे, आनंद भाटे यांच्या मैफलीने नगरकर रसिक तृप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गायक राहुल देशपांडे आणि आनंद भाटे यांनी सादर केलेली नाट्यगीते ऐकताना नगरचे रसिक मंत्रमुग्ध झाले होते. आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्राने बुधवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित केलेल्या या मैफलीस श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.

आकाशवाणीचे कार्यक्रमप्रमुख प्रदीप हलसगीकर यांनी रसिकांचे स्वागत केले. पूर्वार्धात आनंद भाटे यांचे गायन झाले. त्यांनी पुरिया कल्याण राग सादर केला. पारंपरिक ख्याल ‘आज सोबत ब्याहन’ विलंबित एकतालात गायला. नंतर पंडित भीमसेन जोशी यांनी लोकप्रिय केलेली ‘बहुत दिन बिते’ ही चीज सादर केली. मिर्श काफी रागामधील दीपचंदी तालातील ठुमरी ‘पिया तो मानत नाही’ रसिकांनी डोक्यावर घेतली. शेवटी त्यांनी ‘सौभद्र’तील ‘खरा तो प्रेमा’ हे बालगंधर्वांचे पद सादर केले. उत्तरार्धात राहुल देशपांडे यांनी शास्त्रीय गायनाबरोबर नाट्यगीते सादर केली. चंद्रकास रागातील झपतालातील ख्याल सादर त्यांनी केला. राधा धर मधू मिलिंद जयजय हे घुमाळी तालातील गाणे श्रोत्यांना वेगळा आनंद देऊन गेले. केंद्रप्रमुख राजेश बेलदार यांनी आभार मानले.