आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahuri Become First Digital Locker Municipal Council In Country

राहुरी देशातील पहिली डिजिटल लॉकर पालिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राहुरी नगरपालिका देशातील पहिलीच डिजिटल लॉकर सिस्टिम असलेली नगरपालिका बनली आहे. माहिती तंत्रज्ञान दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी या सुविधेचे गुरुवारी दिल्ली येथील संचार भवनात उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी अशी सुविधा देणारी राहुरी ही देशातील पहिलीच नगरपालिका असल्याचे ट्विट करून ही माहिती दिली.

केंद्राच्या 'डिजिटल इंडिया' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत राहुरी पालिकेत डिजिटल लॉकर सिस्टिमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेतून जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी दाखले ऑनलाइन पद्धतीने काढता येणार आहेत. तर वाहन परवाना, शैक्षणिक दाखले, प्रमाणपत्र, महत्वाची कागदपत्र तसेच मालमत्तांचे कागदपत्र डिजिटल स्वरुपात या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवता येणार आहेत. मंत्री प्रसाद यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार दिलीप गांधी, नॅशनल ई-गव्हर्नन्सचे उपसंचालक बिप्रतो नायक, जिल्हा प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, राहुरी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. खासदार गांधी यांच्या पाठपुराव्यामुळेच ही सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाल्याचे मंत्री प्रसाद यांनी सांगितले, तर भविष्यात राहुरी प्रमाणेच जिल्ह्यातील पालिका मनपातही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गांधी म्हणाले.
छायाचित्र: राहुरी पालिकेच्या डिजिटल लॉकर सिस्टिमचे उद्घाटन करताना माहिती तंत्रज्ञान दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद.