आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुरी तालुका नगरला जोडण्यावरून तर्कवितर्क

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - राहुरी तालुका नगर विभागाला जोडण्याच्या प्रस्ताव असून यामुळे ग्रामस्थांमध्ये विविध तर्कवितर्क व चर्चांना उधाण आले आहे. हा तालुका श्रीरामपूर विभागालाच कायम ठेवावा, अशी मागणी होत काही नेत्यांनी केली असताना हा तालुका नगरला जोडणेच हिताचे ठरेल, असे मत काही नेत्यांनी व्यक्त केले आहे.
प्रांतकार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर सर्वच महत्त्वाची शासकीय कार्यालये नगर येथे आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामासाठी राहुरीकरांचा कायमच नगरशी संपर्क येतो. त्यामुळे हा तालुका नगर विभागाला जोडणे हिताचे ठरेल, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.
राहुरी तालुका श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयाला जोडलेला आहे. मात्र, तेथील काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कामासाठी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. एकाच ठिकाणी शासकीय कामकाज होत असताना वेगवेगळ्या ठिकाणी कागदपत्रांचा प्रवास ग्रामस्थांना न परवडणारा आहे. त्यात मोठा कालावधी जातो. र्शीरामपूर ते नगर असा कागदपत्रांचा प्रवास म्हणजे वेळकाढूपणा ठरेल. नव्याने होत असलेला बदल सर्वांसाठी स्वागतार्ह आहे. यामध्ये कोणतेही राजकारण न करता सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी हा बदल मान्य करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.