आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्ड्यावर छापा, २४ प्रतिष्ठित अटकेत, नगर जिल्ह्यात कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या उकांडा फाटा येथील जुगार अड्ड्यावर नगर स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी छापा टाकला. लाख ३३ हजार रुपयांची रोकड, १२ मोटारसायकली, कार, तसेच विविध कंपन्यांचे सुमारे २५ मोबाइल असा एकूण २५ लाख १३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. २४ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. यात जालना जिल्ह्यासह शिरुर, पाथर्डी तालुक्यातील लोक आहेत.

उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी पथकासह उकांडा फाटा येथील हॉटेल राजगडच्या तळमजल्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. एकाच वेळी चार डावांत २४ जण जुगार खेळत असल्याचे आढळले. रोख रक्कम लाख ३३ हजार, १२ मोटारसायकली, कार २५ मोबाइल असा एकूण २५ लाख १३ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

चार जिल्ह्यांतील प्रतिष्ठित जुगारी : नगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील अड्ड्यावर नगरसह बीड, आैरंगाबाद, जालना जिल्ह्यातील प्रतिष्ठित अालिशान कारमधून जुगार खेळायला येत.
बातम्या आणखी आहेत...