आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेची तार चोरणारे अट्टल चोरटे अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
र्शीरामपूर-रेल्वेच्या मालकीची लाखो रुपयांची तांब्याची तार (ओव्हरहेड केबल) चोरी करणार्‍या दोन वर्षांपासून फरार असलेल्या तिघा अट्टल गुन्हेगारांना रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी चार दिवसांपूर्वी मोठय़ा शिताफीने पकडले आहे. त्यांना शुक्रवारी नाशिक येथील कारागृहात पाठवण्यात आले.
दौंड-मनमाड रेल्वेमार्गाचे सध्या विद्युतीकरण सुरू आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात तांब्याची तार वापरली जाते. ही तार तोडून चोरणार्‍या पाच जणांना रेल्वे पोलिसांनी सन 2012 मध्ये पकडले होते. त्यातील तीन जण फरार झाले होते. या तिघांना रेल्वे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अटक केली. बाळू पवार (शिरसगाव), सखाराम दहाडे, सोमनाथ मोरे (दोघे र्शीरामपूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी पवार व दहाडे यांना र्शीरामपूर शहरातून पकडले, तर मोरे यास कुकाणा येथून अटक करण्यात आली. यातील पवार हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडे, बलात्कार यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. रेल्वे पोलिस दलाच्या पोलिस उपनिरीक्षक बी. पी. मीना, कर्मचारी एम. के. व्यवहारे, पवन सर्जेकर, राजेश मिर्शा आदींनी ही कारवाई केली. 24 जानेवारीपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या चोरट्यांना शुक्रवारी नाशिक मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले. तांब्याची तार चोरणारी ही टोळी तार चोरण्यात अत्यंत तरबेज आहे. या तारांमध्ये उच्च दाबाची वीज वहात असूनही ते तार तोडतात. अशा प्रकारे तार तोडताना 2012 मध्ये विजेचा धक्का बसून त्यांच्या एका साथीदाराचा मृत्यूही झालेला आहे. कान्हेगाव, र्शीरामपूर, पुणतांबा, राहुरी आदी ठिकाणी या चोरांनी अक्षरश: धुडगूस घातला होता. या ठिकाणांहून लाखो रुपयांची चार चोरलेली आहे. तार चोरण्यासाठी ही तार तोडावी लागते. उच्च वीजदाबाची ही तार तोडण्यासाठी मोठय़ा कौशल्याची गरज असते. तार तोडल्यानंतर नियंत्रण कक्षात सायरन वाजतो. त्याची सूचना ताबडतोब सोलापूर कंट्रोलला दिली जाते. तेथून संपूर्ण मार्गावर शोध घेण्याचा आदेश दिला जातो. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत हे चोरटे तार घेऊन पसार होतात.