आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये रेल्वेगाड्यांची दुसऱ्या दिवशीही तपासणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दिल्ली-कानपूरमार्गावर एखाद्या ट्रेनला बॉम्बने उडवून देऊ, अशा स्वरुपाच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये दुसऱ्या दिवशीही रेल्वेेगाड्यांची तपासणी करण्यात आली. रविवारी दुपारी झेलम गोवा एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली होती. सोमवारी दुपारी झेलम, गोवा केके एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली. नगर पोलिसांच्या श्वान बाॅम्बशोधक पथकाने या दोन्ही रेल्वेंची कसून तपासणी केली.

दिल्ली-कानपूर रेल्वेमार्गावर ट्रेनला बॉम्बने उडवून देऊ, अशा स्वरुपाच्या धमकीचा ई-मेल मुंबई एटीएसला दोन दिवसांपूर्वी आला. या धमकीच्या पार्श्वभूमीवर नगर रेल्वेस्टेशनवरील लोहमार्ग सुरक्षा दल नगर रेल्वे पोलिसांनी दोन दिवस संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवली. नगर पोलिसांच्या श्वान पथकाने बॉम्बशोधक पथकाने दिल्लीवरुन येणाऱ्या झेलम गोवा एक्स्प्रेसची कसून तपासणी केली. खबरदारी म्हणून नगर रेल्वेस्टेशनवर थांबणाऱ्या गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली. सायबर तज्ज्ञांच्या साह्याने मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाला मेल पाठवणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरु आहे.