आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेच्या कारभारामुळे वर्षाला पावणेतीन कोटींचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सरकारीढिसाळ कारभार कसा असावा, याचे रेल्वे एक उद््बोधक उदाहरण आहे. नगर-पुणेदरम्यानच्या सर्व रेल्वेगाड्यांचे इंजिन दौंड स्टेशनमध्ये बदलावे (शंटिंग) लागते. एका शंटिंगसाठी ३० लिटर डिझेल खर्च होते. फक्त डिझेलवर वर्षाला पावणेतीन कोटींचा खर्च होत असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून समजली. हा खर्च कमी करण्यासाठी फक्त १८ कोटींच्या कॉड लाइनची गरज आहे. मात्र, ‘आंधळे दळते कुत्रे पीठ खाते’ असा कारभार असलेल्या रेल्वेकडे त्यासाठी निधी नसल्याचे पटणारे कारण पुढे केले जात आहे.
नगर-पुणेदरम्यान दौंड रेल्वेस्टेशन आहे. हे आडवळणाला असल्याने नगरहून पुण्याला पुण्याहून नगरकडे येणाऱ्या प्रत्येक रेल्वेचे इंजिन बदलून ते विरुद्ध दिशेला लावावे लागते. या प्रक्रियेत ३० लिटर डिझेल खर्च होतो. कारण एक लावण्याचे एक काढण्याचे अशा इंजिनांना सुरू ठेवावे लागते. नगर-पुणेदरम्यान प्रवासी मालगाड्या मिळून सरासरी ४५ गाड्या ये-जा करतात. डिझेलचा दर ५५ रुपये प्रतिलिटर गृहित धरला, तरी वर्षभरात हा आकडा कोटी ६७ लाख ३० हजारांवर जातो. इंजिन बदलण्याच्या कामासाठी ड्रायव्हर, सहायक ड्रायव्हर, गार्ड, सहायक गार्ड पॉइंटमन अशा पाच कर्मचाऱ्यांची (तीन शिफ्ट मिळून १५ जण) गरज पडते. त्यांचे प्रत्येकी सरासरी वेतन ३० हजार रुपये गृहित धरले, तर वेतनावर वर्षाला ५४ लाखांचा खर्च होतो. हा खर्च अनेक वर्षांपासून सुरू आहे. वर्षानुवर्षे रेल्वेगाड्यांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे हा खर्चही वाढत आहे.
याला पर्याय म्हणून नगर जिल्ह्यातील काष्टी ते पुणे जिल्ह्यातील केडगाव अशी कॉड लाइन टाकण्याचा प्रस्ताव समोर आला. या मार्गाचे सर्वेक्षणही झाले आहे. त्यासाठी १८ कोटींच्या खर्चास रेल्वेमंत्र्यांनी मंजुरीही दिली. मात्र, स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रभावी पाठपुराव्याअभावी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात या कामासाठी फक्त एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. खासदार दिलीप गांधी यांनी या कॉड लाइनसाठी सातत्याने पाठपुरावा केला, पण रेल्वेचे ‘बाबू’ त्यांनाही दाद देत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रेल्वेचेच मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रेल्वेचे स्थानिक अधिकारी आपल्या वरिष्ठांची कशी दिशाभूल करतात आपले पोट ज्यावर आहे, त्या रेल्वेचा कसा आर्थिक फटका देतात, याचे हे उदाहरण आहे.

प्रवाशांची संख्या वाढेल
^कॉड लाइनसाठी१८ कोटी खर्च केले, तर प्रवास वेगवान होईल. या मार्गावरील प्रवासी रेल्वेकडे वळून रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. शिवाय प्रवाशांची संख्या वाढून रेल्वेचा फायदा वाढेल. अधिकाऱ्यांनी कॉड लाइनचा पाठपुरावा केला, तर समस्या लवकर सुटू शकतील.'' हरजितसिंगवधवा, सदस्य, रेल्वे विभागीय प्रवासी सल्लागार समिती, नगर.

स्वच्छतेवरील खर्च अधिक
दौंडला गाडी अर्धा तास थांबत असल्याने स्टेशनच्या स्वच्छतेचा बोजवारा उडातो. या स्टेशनमध्ये दुर्गंधीचे अस्वच्छतेचे साम्राज्य असते. कारण गाडी अधिक वेळ स्टेशनमध्ये थांबते. त्यादरम्यान प्रवासी गाडीतील स्वच्छतागृहांचा वापर करत असतात. त्यामुळे स्टेशनच्या स्वच्छतेवर होणारा रेल्वेचा खर्चही मोठा आहे.

मोठ्या थांब्यामुळे चोरांचा लाभ
गाड्या जास्त वेळ थांबत असल्यामुळे दौंडला चोऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी बंदोबस्ताचा ताण वाढतोच आहे. याशिवाय पोलिसांची कुमक सातत्याने वाढवावी लागत असल्याने बंदोबस्ताचा खर्चही सातत्याने वाढत आहे. चोऱ्यांमुळे प्रवाशांचे होणारे नुकसानही प्रचंड आहे.

मानवी तासांचे नुकसान
एका गाडीतून सुमारे एक हजार प्रवासी प्रवास करतात. इंजिन बदलण्यासाठी एका गाडीला अर्धा तास लागतो असे गृहित धरले, तरी ५०० मानवी तास वाया जातात. प्रवासी गाड्यांच्या संख्येचा विचार केला, तर रेल्वेच्या प्रतिगामी कारभारामुळे दररोज सुमारे १६ हजार मानवी तास वाया जात आहेत. ही मोठी राष्ट्रीय हानी असल्याची प्रतिक्रिया रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी व्यक्त केली.

असा आहे खर्च
दिवसभरातइंजिन बदलण्याचा खर्च ७५ हजार
हाच महिन्याचा खर्च २२ लाख २७ हजार ५०० रुपये
वर्षभरात डिझेलवरचा खर्च दोन कोटी ६७ लाख
१५ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च : ५४ लाख
रेल्वेचा एकूण फटका : कोटी २१ लाख.
बातम्या आणखी आहेत...