आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Railway Track Checking Machine Import From Switzerland In Nagar

रेल्वेमार्गाच्या तपासणीसाठी ‘देशी ट्रकवर विदेशी यंत्र’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-बीड रेल्वेमार्गाचे काम अरणगावपर्यंत पूर्ण झाले आहे. या मार्गावरील रूळ तपासणीसाठी स्वित्झर्लंड येथून रेल्वे मोबाइल फ्लेश वेल्डिंग यंत्र आणले आहे. भारतीय ट्रकवर हे विदेशी यंत्र चढवून रुळाच्या अंतिम तपासणीचे काम सध्या सुरू आहे. या तपासणीनंतर रेल्वे मंत्रालय हा मार्ग सक्षम असल्याचा अहवाल देणार आहे. रेल्वेमार्गाच्या पुढच्या कामाला मात्र अजून गती आलेली नाही.

विमानाने आणले यंत्र
देशात केवळ 40 रेल्वे मोबाइल फ्लेश वेल्डिंग यंत्र आहेत. नगर-बीड रेल्वेमार्गाच्या कामासाठी स्वित्झर्लंड येथून विमानाने हे यंत्र भारतात आणण्यात आले. रेल्वेमार्गावरील जोड जोडण्याचे काम या यंत्राद्वारे केले जाते. अशोक लेलँड कंपनीच्या भारतीय ट्रकवर हे यंत्र चढवून रूळ जोडणीचे काम करण्यात येते. यंत्रामध्ये एक स्वतंत्र संगणक कक्ष आहे. रूळाचे काम करताना काही जोड राहिल्यास अथवा अन्य अडचणी आल्यास त्याची पूर्वसूचना या यंत्राद्वारे देण्यात येते. रुळावरील जोड दिल्यानंतर अल्ट्रासॉनिक प्लॉवर डिटेक्टर तपासणीद्वारे रुळांची अंतिम तपासणी करण्यात येते. या मशीनने जर रूळ सक्षम आहे असे सांगितले, तरच संबंधित मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी दिली जाते.

दक्ष राहून काम करावे लागते
रेल्वे मोबाइल फ्लेश वेल्डिंग यंत्रावर काम करण्यासाठी कानपूर (उत्तर प्रदेश) येथे एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रत्यक्ष काम करताना खूपच दक्ष रहावे लागते. दिवसभरात एका रेल्वे रुळावर जास्तीत जास्त 50 जोड दिले जातात. त्यासाठी दररोज 300 लिटर डिझेल लागते.’’ - प्रवीणकुमार, ऑपरेटर.