आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोलेत रोहिण्या बरसल्या, पहिल्‍या पावसाने झोडपले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - अकोले शहरासह नवलेवाडी, धुमाळवाडी, धामणगाव आवारी, आंबड, मोग्रस, पिंपळगाव खांड, कोतूळ, पांगरी गावांच्या शिवारात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. दरम्यान, राजूर येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे स्मशानभूमीवरील शेड कोसळले.

मंगळवारी सकाळपासूनच वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारी दोनच्या सुमारास विजांचा लखलखाट आणि त्यापाठोपाठ होणारा ढगांचा प्रचंड कडकडाट तर थरकाप उडवणारा होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. सोमवारी (26 मे) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कळस बुद्रुक, सुगाव, वाशेरे, कळस खुर्द परिसराला पावसाने

झोडपून काढले होते.
मंगळवारी दुपारीही या परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणातील वाढलेला उष्मा कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भंडारदरा परिसरात मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.आदिवासी शेतकर्‍यांनी भाताची शेती मशागतीची कामे सुरू केली आहेत. रोपांच्या निर्मितीसाठी राख टाकण्याच्या कामांना वेग आला आहे. बिगर आदिवासी भागातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे.