आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही सरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात सलग दुसर्‍या दिवशी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला असून गणेशोत्सवातील उत्साहही वाढला आहे.

तब्बल महिन्याभराच्या विर्शांतीनंतर रविवारी रात्रीपासून शहर व जिल्ह्यात पुन्हा पावसाला प्रारंभ झाला आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट होते. यंदा मात्र 1 जूनपासून पावसाला सुरुवात झाली. 1 ते 30 जूनपर्यंत 1,899 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. जून, जुलैत झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात तब्बल 130 टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या. आतापर्यंत जिल्ह्यात 5 हजार 12 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 3 हजार मिलिमीटर पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2 हजार मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरीच्या 72 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जुलैत दमदार पाऊस झाला. मात्र, 8 ऑगस्टपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पिके जळण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. सोमवारी रात्री व मंगळवारी दुपारी केडगाव, सावेडी, भिंगार या उपनगरांसह शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मंगळवारी अकोले 35, राहाता 2, र्शीरामपूर 10, राहुरी 12, नेवासे 40, नगर 10, शेवगाव 3, पाथर्डी 20, पारनेर 4, कर्जत 16, र्शीगोंदे 11 व जामखेडमध्ये 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे धरणांतील साठय़ात काही प्रमाणात वाढ झाली आहे. भंडारदरा धरणात 11 हजार 49 दशलक्ष घनफूट (100 टक्के), मुळा धरणात 18 हजार 386 (70 टक्के), निळवंडे धरणात 3 हजार 298 (63 टक्के), आढळात 742 (70 टक्के), घोड 7 हजार 649 (100 टक्के) पाणीसाठा आहे.