आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वळवाच्‍या पहिल्‍या पावसाने कोल्‍हापूरकर सुखावले, सिंधुदुर्गात हलक्‍या पावसाच्‍या सरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदूर्गात विजेच्‍या गडगडाटासह हलक्‍या पावसाच्‍या सरी कोसळल्‍या - Divya Marathi
सिंधुदूर्गात विजेच्‍या गडगडाटासह हलक्‍या पावसाच्‍या सरी कोसळल्‍या
कोल्हापूर - कोल्‍हापूरला आज वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. अवघ्‍या 15 मिनिटे पडलेल्‍या पावसामूळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. शहरात मंगळवारी संध्‍याकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी अचानक सोसाट्याच्या वाऱ्याबरोबर विजांचा कडकडाट सुरू झाला आणि वादळी पावसाला सुरवात झाली. 
 
गेल्‍या काही दिवसापासून जाणवणाऱ्या प्रचंड उष्म्या मुळे नागरिक हैराण झाले होते. आज पडलेल्या पावसामुळे जमिनीची धूप थंडावली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्‍यामुळे शेतकरी आणि सामान्‍यांना दिलासा मिळाला. वळवाच्या पहिल्या पावसाने कोल्हापूरकरही सुखावले आहेत. 
 
अचानक पडलेल्‍या पावसामुळे कोल्हापुरातले जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. फिरत्या व्यापाऱ्यांची, रिक्षावाल्यांची आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तसेच महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची आणि भाविकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
 
 
सिंधुदुर्गात हलक्‍या पावसाच्‍या सरी
सिंधुदुर्गातील वैभववाडी शहर आणि परिसरात बुधवारी सायंकाळी विजेच्या गडगटासह अवकाळी मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे बुधवार आठवडा बाजारात आलेल्या व्यापारी व ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली.
 
बुधवारी सायंकाळी पडलेल्या हलक्या सरीमुळे वातावरणामध्ये आल्हाददायक गारवा पसरल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. शहरात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यात उष्णतेमुळे नद्या,विहिरी कोरड्या झाल्यामुळे काही गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे अशा गावातील ग्रामस्थ मोठ्या अवकाळी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. मात्र उशीरा आलेल्या आंब्‍याच्‍या पिकाला या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...