आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये पावसाची दमदार हजेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहर व उपनगरात सोमवारी पावसाने दमदार हजेरी लावली. जागोजागी पाणी साचले होते. भिस्तबाग नाका, चितळे रोड, तसेच उपनगरांत रस्त्यांच्या बाजूला बसून भाजीपाला विकणार्‍यांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले. नोकरदार व विद्यार्थ्यांची पावसामुळे चांगलीच त्रेधा उडाली.

माळीवाडा, कापडबाजार, तेलीखुंट, लालटाकी, सज्रेपुरा, बालिकार्शम रस्ता, सिव्हिल हडको व पाइपलाइन रोड परिसर, सावेडी, एमआयडीसी, निंबळक, नागापूर, मुकुंदनगर, तसेच भिंगारमध्ये चांगला पाऊस झाला. भिंगारमध्ये दुपारी दीड तास पाऊस झाला. थोडी विर्शांती घेत घेत अधून-मधून पावसाची रिपरिप सुरूच होती.

सोमवारचा दिवस असल्यामुळे नोकरदार वर्ग व शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सकाळी घराबाहेर पडले. पावसामुळे त्यांची धांदल उडाली. केडगाव परिसरात दुपारपर्यंत उन होते. सायंकाळी मात्र पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. भिस्तबाग व पाइपलाइन रोड परिसरात रस्त्याच्या बाजूला भाजीपाला विकणार्‍यांचे पावसामुळे चांगलेच हाल झाले. पाऊस सुरू असताना काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 19.28 टक्के पाऊस
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1499.54 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरी 107.11 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी (मिलिमीटरमध्ये) - नगर - 121.6, पारनेर - 113, पाथर्डी - 28 , शेवगाव - 71, संगमनेर - 94, कोपरगाव - 109, अकोले - 131, र्शीरामपूर - 104, नेवासे - 52.5, राहाता - 225.4, राहुरी - 65.4, कर्जत - 146.2, जामखेड - 86, श्रीगोंदे - 152.2. एकूण 19.28 टक्के पाऊस झाला आहे