आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर शहर व जिल्ह्यात 24 तासांत 313 मिलिमीटर पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर शहर व जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी सायंकाळपासून शहरात सुरू झालेला पाऊस रात्रभर सुरू होता. मंगळवारीही दिवसभर रिमझिम चालू होती. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 313 मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 800 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे भंडारदर्‍यासह अन्य धरणांतील साठय़ात वाढ झाली आहे.

यंदा 1 जूनपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जिल्ह्यात 1 ते 25 जूनपर्यंत 1800.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आतापर्यंत सर्वाधिक 231.8 मिलिमीटर पावसाची नोंद राहाता तालुक्यात झाली. अकोले 141, संगमनेर 109, कोपरगाव 115, श्रीरामपूर 119, राहुरी 92.8, नेवासे 78.5, नगर 143, शेवगाव 107, पाथर्डी 73, पारनेर 126, कर्जत 165.2 श्रीगोंदे 184.5 व जामखेडमध्ये 127 मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात 416.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.जिल्ह्यात आतापर्यंत 26.04 टक्के पाऊस झाला आहे.

निळवंड्याचे आवर्तन थांबवले
निळवंडे धरणातून श्रीरामपूरसाठी देण्यात आलेले आवर्तन मंगळवारी सायंकाळी 7 वाजता थांबवण्यात आले. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस - भंडारदरा - 14, रतनवाडी - 26, घाटघर - 76, पांजरे - 38 व वाकी - 11 मिलिमीटर.

अनेक भागात पेरण्यांना वेग
गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस न झाल्याने खरिपाच्या केवळ 50 टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा मात्र पेरण्यांना वेग आला आहे.अकोले तालुक्यात भाताची रोपे टाकली असून, पाथर्डी, जामखेड वगळता संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदे, कर्जत, श्रीरामपूर, शेवगावसह अन्य तालुक्यांत 30 टक्के पेरण्या झाल्या आहेत.