आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये संततधार; घाटघरला 80 मिमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मध्यंतरी गायब झालेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. अकोले तालुक्यातील घाटघर येथे सर्वाधिक 80 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या अनेक भागांत शुक्रवारी कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. नगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणात 2 हजार 247 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून साठा 34 टक्के झाला आहे. भंडारदर्‍यात 4,705 दशलक्ष घनफूट साठा झाला आहे.

1 ते 11 जुलैपर्यंत जिल्ह्यात 2,196 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 239 मिलिमीटर पाऊस राहाता तालुक्यात झाला. अकोले 177, संगमनेर 127, कोपरगाव 133, श्रीरामपूर 128, राहुरी 106, नेवासे 87, नगर 164, शेवगाव 147, पाथर्डी 134, पारनेर 145, कर्जत 215, श्रीगोंदे 204 व जामखेडमध्ये 179 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नगर शहरात गुरुवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी शहरासह केडगाव, सावेडी व भिंगार भागात दिवसभर सरी कोसळत होत्या. अकोले तालुक्यात पाऊस सुरू आहे.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 54 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. श्रीगोंदे व जामखेडमध्ये प्रत्येकी 14 मिलिमीटर पाऊस झाला. कर्जत - 13 , अकोले - 4, कोपरगाव - 2, श्रीरामपूर - 1, नेवासे - 1, नगर - 1 , शेवगाव - 3 व पाथर्डीत 1 मिंलिमीटर पाऊस झाला. पारनेर, राहाता, राहुरी व संगमनेर तालुक्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. अकोले तालुक्यातील राजूर - 3, शेंडी - 19, ब्राrाणवाडा - 2, समशेरपूर - 4, कोतूळ - 4, वीरगाव - 1 वाकी - 16, घाटघर - 80, रतनवाडी - 51, पांजरे - 30, भंडारदरा - 19 व साकीरवाडी येथे 7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पावसामुळे धरणांमधील साठय़ात वाढ झाली आहे. 11,039 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात 4,705 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणात फक्त 1,798 दशलक्ष घनफूट पाणी होते. निळवंडे धरणात 663, आढळात 130 दशलक्ष घनफूट पाणी आहे. नगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणात गेल्या वर्षी या कालावधीत 5,239 दशलक्ष घनफूट पाणी होते. शुक्रवारी धरणात 8, 850 दशलक्ष घनफूट पाणी होते.

जिल्ह्यात उसाव्यतिरिक्त खरिपाचे 4 लाख 1 हजार 230 हेक्टर क्षेत्र आहे. 8,200 हेक्टर क्षेत्र भाताचे आहे. त्यापैकी 3,397 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. बाजरीचे क्षेत्र 1 लाख 9 हजार 830 हेक्टर आहे. त्यापैकी 1 लाख 30 हजार 901 हेक्टरवर पेर झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक 38,300 हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल संगमनेर तालुक्यात 30 हजार व श्रीगोंदे तालुक्यात 11,791 हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे.