आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर परिसरात पावसाची जोरदार हजेरी, तीन लाख 34 हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- तब्बल वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. नगर शहरात सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर, चौकात पाणी साचले होते. त्यामुळे काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते. केडगाव उपनगरांत पावसाचे प्रमाण तुलनेने कमी होते.
 
यंदा जिल्ह्यात जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. ते १८ जूनपर्यंत अकोले, संगमनेर, कोपरगाव, शेवगाव, पाथर्डी जामखेड हे तालुके वगळता अन्य तालुक्यांत दमदार पाऊस झाला. पहिल्या टप्प्यात खरिपाच्या लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या. दुसऱ्या टप्प्यात पेरण्या लाख ७५ हजार हेक्टरवर गेल्या. शुक्रवारअखेरपर्यंत लाख ३४ हजार हेक्टरवर म्हणजे ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. तथापि, १८ जूनपासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पेरण्या झालेले क्षेत्र वाया जाण्याची भीती होती. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
 
गेल्या २४ तासांत नगर, पाथर्डी वगळता सर्वच तालुक्यांत पाऊस झाला. गेल्या २४ तासांत अकोले २४, संगमनेर १७, कोपरगाव ४, श्रीरामपूर ४, राहुरी १, नेवासे ३, राहाता १४, शेवगाव २, पारनेर ११, कर्जत १५, श्रीगोंदे जामखेड येथे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस राहाता तालुक्यात (७८.३७ टक्के) झाला आहे. कर्जत तालुक्यात ५५ टक्के, अकोले ५० टक्के, संगमनेर ३३ टक्के, कोपरगाव २५ टक्के, श्रीरामपूर ३५ टक्के, राहुरी ३३ टक्के, नेवासे ४५ टक्के, नगर ४१ टक्के, शेवगाव २७ टक्के, पाथर्डी २५ टक्के, पारनेर ४३ टक्के, श्रीगोंदे ३२ टक्के जामखेड ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
 
शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात बाजरीच्या ४० टक्के, मक्याच्या ६६ टक्के भाताच्या १३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. उडिदाच्या ३३४ टक्के, मुगाच्या ३३४ टक्के तुरीच्या ११३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भुईमूग १०४ टक्के, तीळ १६ टक्के, कारळे टक्के, सूर्यफूल टक्के, सोयाबीन ९० टक्के कपाशीच्या ७७.३७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अजून ५० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या होणे बाकी आहे. ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. पावसाचा जोर असा कायम राहिल्यास खरिपाची पिके जोमदार येतील, अशी शक्यता आहे. पावसाचे आगमन होताच भाजीपाल्याची आवकही वाढली असून, भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत.
 
महाराष्ट्रातील अनेक नद्यांना पावसामुळे पूर आला आहे. नगर शहरातून वाहणारी सीना नदी मात्र आता कुठे थोडी वाहती झाली आहे. शहरातून सोडण्यात आलेल्या सांडपाण्यामुळे या नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे. शिवाय अनेक ठिकाणी वीटभट्ट्यांचे पक्क्या बांधकामांचे अतिक्रमण झाल्यामुळे नदीचे पात्र अरूंद झाले आहे. या पावसाळ्याआधी नदीपात्राची स्वच्छता झाली नाही. थोडा जरी पाऊस झाला की, नगर शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीत अडथळा येतो. चितळे रस्ता, नालेगावात ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. जुना मंगळवार परिसरातील रस्त्यावरही शुक्रवारी पावसाचे पाणी साचले होते. त्यात मध्येच टाकलेल्या पाइपचा अडथळा वाहनचालकांना पार करावा लागत होता.
 

धरणांतील पाणीसाठा
भंडारदराधरण ४८.८५ टक्के भरले अाहे. नगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा कमी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या धरणात ४७.५८ टक्के साठा होता. यंदा केवळ ३० टक्केच साठा आहे. निळवंडे धरणात १६.२० टक्के, तर आढळा धरणात १३.६८ टक्के पाणीसाठा आहे.
 
बातम्या आणखी आहेत...