नगर - महिन्याभरापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने बुधवारी सावेडी व नागापूर परिसरात जोरदार हजेरी लावली. कुष्ठधाम परिसरात झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नागापूर, एमआयडीसी परिसरातही तासभर पाऊस झाला. उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. तथापि, नगर शहराचा मध्यभाग, केडगाव परिसर कोरडा होता. जिल्ह्याच्या अन्य भागात अजूनही पावसाला सुरुवात न झाल्याने खरीप हंगाम आणखी धोक्यात आला आहे.
फोटो - सावेडी परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते.