आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरामुळे आर्वी बेटावर 300 जण अडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे (जि. नगर) - खडकवासला व चासकमान धरणातील पाणी सोडण्यात आल्याने मंगळवारी भीमेच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. आर्वी बेटावर 300 लोक अडकले आहेत. निमगावखलूजवळ भीमेचा विसर्ग सुमारे पाऊण लाख क्युसेक होता. त्यात वाढ होण्याची शक्यता महसूल विभाग व पूरनियंत्रण विभाग (पुणे) यांनी व्यक्त केली आहे. पुराचा सर्वाधिक धोका आर्वी बेटाला बसला. या बेटावर 300 नागरिक राहतात. देऊळगावराजे (ता. दौंड) व आर्वी गाव (ता. श्रीगोंदे) या दोन्ही बाजूंचा बंधार्‍याचा रस्ता जलमय झाल्याने बेटाचा संपर्क तुटला.

भंडारदरा 80% भरले
भंडारदरा धरणाच्या साठय़ात मंगळवारी 1032 दलघफू भर पडली. धरणातील साठा 8891 दलघफू (80.54 टक्क्यांवर) झाला आहे.धरणात 10,500 दशलक्ष घनफूट साठा ठेवून अतिरिक्त पाणी सोडण्यात येईल. त्याचा जायकवाडी धरणाला फायदा होईल.
(फोटो : मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 80 टक्क्यांवर गेला. छाया : विलास तुपे)