आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांची धावपळ, विजांच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत वृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने बुधवारी नगर शहरात जोरदार हजेरी लावली. दुपारी अडीचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. या पावसामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ उडाली. देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने निघालेल्या नागरिकांच्याही उत्साहावरही पाणी पडले.

मागील दोन दिवसांपासून केडगाव परिसरात पाऊस होत होता, परंतु नगर शहर कोरडे होते. सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी झाली होती. दुपारी अंधारून आले आणि काही वेळातच जोरदार सरी कोसळायला सुरूवात झाली. थोड्याच वेळात शहरातील सगळे रस्ते जलमय झाले. चौकातं मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय झाली.
जिल्ह्याच्या अनेक भागातही समाधानकारत पाऊस झाला. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे खरिपाच्या १२५ टक्के पेरण्या झाल्या. मात्र, मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली होती. या पावसामुळे पिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
नगर तालुक्यासह पारनेर, जामखेड, कर्जत, नेवासे राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा भागात जोरदार सरी कोसळल्या. यापूर्वी या भागात पावसाने दडी मारली होती. चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...