आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांत होणार जिल्ह्यात पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राजस्थानचे तापमान अजूनही ४१ अंश सेल्सियस असल्याने ढग सोमवारपासून (२९ जून) गोबीऐवजी राजस्थानच्या दिशेने ओढले जाणार आहेत. पाऊस होऊन हा प्रदेश थंड झाल्यानंतर दोन दिवसांत नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे, असे हवामान अभ्यासक बी. एन. शिंदे यांनी रविवारी सांगितले.

२१ जूनला सूर्य कर्कवृत्तावर पोहोचला. मंगोलियातील गोबीच्या वाळवंटात १८ तासांचा दिवस झाला आहे. सूर्यकिरणे लंबरूप पडल्याने तेथील तापमान वाढून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे मागील तीन-चार दिवस नगरसह मध्य महाराष्ट्रात नैऋत्येकडून वारे ओढले जात आहेत. गोबीच्या वाळवंटात पाऊस झाला, तसेच सूर्याचे दक्षिणायन सुरू झाल्याने तेथील दिनमान वेगाने कमी होत आहे. पण राजस्थानचे तापमान अजूनही ४१ अंश सेल्सियसवर असल्याने ढग गोबीऐवजी सोमवारपासून राजस्थानच्या दिशेला ओढले जाऊन तेथे पाऊस होईल.
हा प्रदेश थंड झाल्यानंतर दोन दिवसांत वाहणारे वारे थांबून नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असे शिंदे यांनी सांगितले.दरम्यान, पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाचे पुनरागमन झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...