आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rainfall Fullfil Thirstiness Of 5.50 Lakh People

परतीच्या पावसाने भागवली साडेपाच लाख नागरिकांची तहान, पंधरा दिवसांत ३३१ टँकर बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मागील आठवड्यात झालेल्या परतीच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न बराचसा कमी झाला असून, गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ३३१ टँकर बंद प्रशासनाने बंद केले आहेत. आठवड्याभरात टँकरची संख्या आणखी कमी होणार आहे.

पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील तब्बल लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून होते. आता ही संख्या लाख ५० हजार ४५९ झाली आहे. साडेपाच लाख नागरिकांची तहान परतीच्या पावसाने भागवली आहे. गेल्या वर्षी कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे जानेवारीपासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. गेल्या वर्षी जून ते ऑगस्टअखेर ७१ टक्के पावसाची नोंद झाली होती. कमी पावसामुळे जानेवारीपासून ग्रामीण भागातून टँकरची मागणी वाढू लागली होती. फेब्रुवारी ते जूनअखेरपर्यंत टँकरची संख्या ४५० वर गेली होती.

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाल्याने टँकरची संख्या काही प्रमाणात घटली होती. मात्र, १५ जूनपासून पावसाने दडी मारल्याने टँकरच्या संख्येत ऐन पावसाळ्यात वाढ होत गेली. सप्टेंबरपर्यंत टँकरची संख्या ५१९ वर गेली. तब्बल लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत होती.

मात्र, सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने टँकरची संख्या कमी होत गेली. गेल्या पंधरा दिवसांत ३३१ टँकर प्रशासनाने बंद केले आहे. सध्या केवळ १५३ गावे ६९४ वाड्या-वस्त्यांना १९० पाणी टँकर सुरु आहेत. पाथर्डी तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी सर्वाधिक १०१ टँकर सुरु होते. या तालुक्यात सध्या १५ टँकर सुरु आहेत. त्याखालोखाल पारनेर तालुक्यात २९ टँकर सुरु आहेत. संगमनेर (३०), कोपरगाव (१), नेवासे (३), राहाता (३), नगर (१५), शेवगाव (४०), कर्जत (१९), जामखेड (१५) श्रीगोंदे (२) टँकर सुरु आहेत.