आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा परिसराला पावसाची प्रतीक्षा; 'भंडारदरा' 'मुळा'तील साठ्यात किरकोळ वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - भंडारदरामुळा धरणांच्या पाणलोट परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ८५२०, मुळाचा पाणीसाठा ११९०३ दशलक्ष घनफूट झाला होता. भंडारदरा धरण ७८ टक्के भरले आहे. मुळा धरण बुधवारी सायंकाळपर्यंत ५० टक्के भरण्याची शक्यता आहे. निळवंडे धरणात ४४५७, तर आढळा धरणात ७५८ दशलक्ष धनफूट (७५ टक्के) पाणीसाठा आहे.

या भागात सध्या ऊन्हं पडत असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या भागात पर्यटक येऊन मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या वर्षी १५ ऑगस्टला धरण भरण्याची शक्यता मावळली आहे.
दरम्यान, १५ १६ ऑगस्टला सलग सुट्या असल्याने दर वर्षीप्रमाणे या परिसरात होणारी पर्यटकांची गर्दी त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन यावर्षी या भागात एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे, अशी माहिती राजूर पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार राहुल पाटील यांनी दिली. पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेंडी (भंडारदरा डॅम) येथे मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस वनक्षेत्रपाल पी. टी. पाटील, पंचायत समितीचे सदस्य दिलीप भांगरे, सरपंच संगीता भांगरे उपस्थित होते.

राहुल पाटील यांनी संगमनेर, अकोले, राजूरहून येणाऱ्या सर्व चारचाकी दुचाकी गाड्या रंधा धबधब्यापासून वाकी वारंघुशीमार्गे भंडारदरा येथे जातील. परतीच्या प्रवासात त्या भंडारदराहून गुहिरे रंधामार्गे पुढे जातील. मात्र, एकेरी वाहतूक धरणाच्या पश्चिम भागात राहणार नाही. मद्यपान करून येणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजूर भंडारदरा येथे चेक पॉइंट ठेवण्यात येतील. तेथे ‘ब्रेथ अॅनालायझर’ द्वारे पर्यटकांची चाचणी होऊन पुढे सोडण्यात येईल. पर्यटकांना कोठेही मद्यपान करता येणार नाही, असे स्पष्टपणे जाहीर करण्यात आले आहे. या दोन दिवसांत बंदोबस्तासाठी ३० पोलिस यात महिला पोलिसांसह राजूर महाविद्यालय शेंडी महाविद्यालयाचे शंभर विद्यार्थी, पाटबंधारेचे ६० कर्मचारी नियंत्रण करणार आहेत. वनखाते त्यांच्या अखत्यारीतील जबाबदारी सांभाळेल, असे वनक्षेत्रपाल पाटील यांनी सांगितलेे.

कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी
भंडारदरामुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी पुढे आली आहे. या वर्षी या परिसरात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. असे कधीच घडले नसल्याचे वृद्ध आदिवासी बोलून दाखवतात. या भागात कृत्रिम पाऊस पाडला, तर धरणे लवकर भरून मराठवाड्याकडे लवकर पाणी सोडण्याचा मार्ग खुला होणार असल्याचे जाणकार बोलून दाखवत आहेत.