आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्‍ह्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू, पावसाचा जोर काही भागात अजून कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर जिल्‍ह्याच्या काही भागात पावसाचा जोर अजून कायम आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जामखेड तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिल्‍हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू केले आहेत. शहर व जिल्ह्यात २१ ऑगस्टपासून पावसाला सुरुवात झाली.
एखाद्या दिवसाचा अपवाद वगळता पाऊस रोज हजेरी लावत आहे. मंगळवारीही शहर व जिल्‍ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी अकोले तालुक्यात सर्वाधिक ४३ मिलिमीटर पाऊस झाला. संगमनेर १६, राहुरी ५, कोपरगाव २०, नेवासे २४, राहाता १२, शेवगाव २६, पाथर्डी १२, पारनेर ८, कर्जत ३, श्रीरामपूर ४ व जामखेड येथे ४ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सोमवार अखेरपर्यंत ३२१ मिलिमीटर पाऊस झाला. गेल्या २४ तासांत १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
मुसळधार पावसामुळे जलि्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. सोमवारी नांदूर मध्यमेश्वर धरणातून १५ हजार २४८ क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले. ग्रामीण भागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनलि कवडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.