आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लाभक्षेत्राकडेपाठ फिरवलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणांचे पाणलाेट क्षेत्र अकोले तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पुनरागमन झाले आहे. अकोले तालुक्यात आतापर्यंत सरासरीच्या ६२ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, त्या तुलनेत मुळा भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. सध्या दोन्ही धरणांत संथगतीने नवीन पाण्याची आवक सुरू आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात अधिक पाऊस आतापर्यंत झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत ४९७ मिलिमीटर या एकूण सरासरीच्या अवघा १२ टक्के पाऊस झाला होता. मात्र, यंदा आतापर्यंत एकूण सरासरीच्या २२ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. यात सर्वाधिक पाऊस अकोले तालुक्यात नोंदवण्यात आला आहे. अकोले तालुक्यात ३०६ मिलिमीटर पाऊस झाला, तर त्याखालोखाल नगर, जामखेड, नेवासे शेवगाव तालुक्यात प्रत्येकी १५७, १४५, १३० १२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाथर्डी, संगमनेर या दोन्ही तालुक्यांत ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
श्रीरामपूर वगळता सर्वच तालुक्यांमध्ये गत वर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या १०७ मिलिमीटर पाऊस आतापर्यंत झाला असून अकोले वगळता इतर तालुक्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे.
जुलै महिना कोरडा जाण्याचा प्रकार गेल्या २० ते २५ वर्षांत कधीच घडला नसल्याचे सांगण्यात येते. यंदा जुलैचा शेवटचा आठवडा जवळ आला, तरी अकोले वगळता जिल्ह्याच्या इतर भागात पाऊस झालेला नाही. जूनच्या मध्यात पडलेल्या पावसावर झालेल्या पेरण्याही पावसाअभावी वाया गेल्या आहेत. जवळपास पन्नास टक्के पेरण्या वाया गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच दुबार पेरणीसाठी शासनाकडून अनुदान मिळण्याची मागणी जोर धरू लागली अाहे. मात्र, दुबार पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊसच नाही.

गेल्या वर्षी मुळा धरणाचा उपयुक्त साठा दोन टक्क्यांच्या खाली गेला होता. धरणात १२ जुलैला नवीन पाण्याच्या आवक सुरू झाली होती. गतवर्षी याच कालावधीत धरणात ५९५३ दशलक्ष घनफूट साठा झाला होता. गत वर्षीच्या तुलनेत यंदा पंधरा दिवस अगोदरच नवीन पाण्याची आवक मुळा धरणात सुरू झाली. मात्र, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ सुरू आहे. सध्या धरणात ५८४७ दशलक्ष घनफूट पाणी आहे. उपयुक्त साठा सव्वासहा टक्क्यांवर पोहोचला अाहे. भंडारदरा धरणात गत वर्षीच्या २२५५ च्या तुलनेत यंदा ३७८२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे क्षेत्र अधिक
जिल्ह्यातरब्बी हंगाम घेणारी १००६ गावे असून लाख ४० हजार २०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिके घेतली जातात. त्या तुलनेत खरीप हंगामाची ५७९ गावे असून लाख १२ हजार १५० हेक्टर क्षेत्रावर खरिपांची पिके घेण्यात येतात. खरिपाच्या सरासरी एकूण क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्रावर सध्या पेरणी झाली असून यातील पन्नास टक्के पेरणी वाया गेल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. यापुढे होणाऱ्या पावसावरच खरिपाची उर्वरित रब्बीची पेरणी अवलंबून आहे.
नुसतेच तयार होते पावसाळी वातावरण

गेल्याआठवडाभरापासून जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार होत असले, तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सकाळी पावसाचे वातावरण तयार होत असल्याने दिवसभर शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागत आहेत. आठवडाभर असाच प्रकार सुरू असून पावसाने चेष्टा लावल्याचा सूर शेतकऱ्यांमधून उमटत आहे. आता पुन्हा नव्याने जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज, तरी खरा ठरावा, अशी प्रार्थना शेतकऱ्यांकडून सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...